मधुसूदन नानिवडेकर - वादळ आहे म्हणून काहे स्वप...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वादळ आहे म्हणून काहे स्वप्न घराचे पडू नये का ?
कफल्लकाच्या जन्मामध्ये नवीन काही घडू नये का ?
' पाऊस आला, भिजवुन गेला ' तक्रारीचा सूर कशाला ?
भिजणार्याने जरा बाजुला आडोशाला दडू नये का ?
असेच असते नाते नुसते वरवरचे हे समजुन घ्यावे...
प्रेमभंग होणारच...तर मग प्रेमामध्ये पडू नये का ?
' पाणी अडवा, पाणी जिरवा ' सुंदर आहे जरी योजना
शेताच्या बांधावर माझ्या थेंब एकही अडू नये का ?
सुखा तुला मी कधीच नाही खुणावली रे चुकूनसुद्धा
सुखा तुला पण कधीच माझे निवास हे सापडू नये का ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP