माधव काळे - पायवाट गेलेली असते दूरवर ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पायवाट गेलेली असते दूरवर
कशी वळणं घेत
कधी खाच-खळगे पार करत
कधी पठारावरून
कधी चढ-उतारावरून
कधी मध्येच थांबल्यासारखी वाटून
घेते नवं वळण
आणि निघून जाते पुढं....
तिला नसतं लावायचं
माणसाच्या आयुष्याचं मोजमाप
जीवनवाटही अशीच....
कधी जाते सुखाच्या हिरवळीतून
कधी दुःखाच्या डोंगरावरून
कधी आनंदाच्या सावलीतून
कधी निराशेच्या वाळवंटातून
जात असते दूरवर....
पण कधी कधी थांबतेही
अर्ध्यावरच....!
N/A
References : N/A
Last Updated : December 30, 2017
TOP