संजीवकुमार सोनवणे - आणल्याची गोष्ट.... घासलेट...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आणल्याची गोष्ट....
घासलेटच्या वाती काखेत घेऊन
आख्खा गावकूस तुडवत
बाप उजेड वाटायचा रात्री- बेरात्री
भल्या पहाटे अंगावर काळोख पांघरुन
उरलेल्या वाती जमा करायचा
उजेड होईस्तोवर....
बाप रंगात आला की
घासलेटच्या वातीचा धुराडा करुन सांगायचा
वस्तीत उजेड आणल्याची गोष्ट
बाप गेला तसा
वस्तीतला काळोखही सोबत घेऊन गेला कायमचा.
आता आख्खी वस्ती न्हातेय सौरऊर्जेच्या प्रकाशात
दुरर्फा पसरलेला नाला आता बंडिंग झालाय
पाण्याला मोताद असणार्या नळातून पाणी चराचरा वाहतंय
झडीच्या पावसात बदाबद गळणार्या मातीच्या घरांनी
काँक्रिटची चादर पांघरलीय
पोरं आता खेळताहेत
इंटरनेट, फेसबुक, व्हाँट्स अँप
घासलेटच्या वाती लावून
बापानं वस्तीत आणलेला उजेड
आता लख्ख स्ट्रीट लाईट झालाय !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP