महाभारत देशा - सुवर्ण रंगाच्या हरीत क्रा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सुवर्ण रंगाच्या हरीत क्रांतीच्या महाभारत देशा
वंदन तूजला माय भूमिच्या महाभारत देशा ॥धृ॥
काश्मिर कोकण कन्याकुमारी हरीत अलंकार
नारळ नारींग सफरचंद आंबा अंजीर फळा
फूलानी बहरलेल्या महाभारत देशा ॥१॥
आसाम पंजाब कर्नाटक खजीन्याचा बिहार
सोने चांदी हिरे माणिके सुवर्ण अलंकार
हिंदू मुस्लीम अन् शिख इसाई समभाव देशा ॥२॥
विंध्य हिमाचल द्रोणागीरी सह्याद्रीच्या रांगा
कृष्णा युमना कावेरी ब्रह्मपुत्रा गंगा
गर्जनारा हिंद सांगर महाभारत देशा ॥३॥
फळा फूलांनी बहरलेला मंगल काश्मीर हा
रंग गुलाबी मन मोहन जयपूर म्हैसूर हा
रुप मनोहर आग्रा धवल जमहल देशा ॥४॥
इथे टागोर, विवेकानंद इथे रामकृष्ण
महाभारत रामायण साहित्याची खाण
स्वातंत्र्याचा तिलक ललाटा महाभारत देशा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP