अजीज मुक्री - दाटलेल्या आसमंती मेघराजा ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दाटलेल्या आसमंती
मेघराजा गडगडू दे
धुंद झालेल्या सरींनी
तृप्त धरतीला करु दे
तप्त मातीला मिळू दे
गंध भिजलेल्या फुलांचा
अन् विसावू दे थवाही
चिंब ओल्या पाखरांचा
रानवेडया अमृताचे
दान मातीला मिळू दे
ओसपडल्यां माळरानी
प्रेम हिरवे अंकुरु दे
वाहत्या वार्यासवे मग
पीक मोत्यांचे डुलू दे
भोपळा अन् काकडीचे
वेल बांधावर फुलू दे
बैल, गाई-वासरांच्या
वैरणीची सोय व्हावी
अन् बळीराजा तुझी तू
आत्महत्या थांबवावी !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP