शब्बीर दाऊद - अंधारल्या रातीत दिव्याच्य...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अंधारल्या रातीत दिव्याच्या वातीत
केला रं अभ्यास आम्ही केला रं अभ्यास
नाही आम्हा मिळायाची वह्या कधी पुस्तकं
मागा लागायची आम्हा रं तयासाठी भीक
शिकायाचं खूप हाच होता आम्हा ध्यास
केला रं अभ्यास...
घेऊन जगलो मुकाट पोटास रं चिमटा
खाऊन रं शिव्याशाप चोर अन् भामटा
विसरून जगलो रे भूक अन् प्यास
केला रं अभ्यास...
पडायच्या पाया आम्ही ते ठोकतात सलाम
करतात आता ते हात जोडून राम राम
आहे का रं खरं हे की नुसताच भास
केला रं अभ्यास...
आम्हीदेखील माणूस होतो विसतले ते होते
धुंदीत आपल्या जगत होते डोळ्यावरी घेऊन पोते
आम्हा पुढं झुकाय त्याचं मन रं उदास
केला रं अभ्यास...
मनोमन खात्री आम्हां देवानं केला न्याय
देऊन रं साहेबी वाट दूर केलाय रं अन्याय
आभार रं देवा तुझे बनविलेस आम्हा खास
केला रं अभ्यास...
अंधारल्या रातीत दिव्याच्या वातीत
केला रं अभ्यास आम्ही केला रं अभ्यास
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP