योगेश वैद्य - लाटांसरशी नशीब माझे जरा स...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
लाटांसरशी नशीब माझे जरा सरकले होते
पायाखाली वाळू नाही, मला समजले होते
दुर्दैवाला कशी नेमकी वाचा फुटली होती...
माझ्यामागे कुठे कुठे जाऊन बरळले होते !
मेलो आहे, असे मलाही मुळी वाटले नाही
मला चटावर जिवंत असतानाच उरकले होते !
देहाचे गाठोडे घेउन मी पोबारा केला...
मी मेल्याचे माझ्यावाचुन कुणास कळले होते ?
माझ्या हक्काला हक्काची झोप लागली नाही
दुकान दुनियेने वशिल्याचे पुन्हा उघडले होते !
नशिबापाशी पुन्हा पुन्हा तो हिशेब मागत होता...
मला कळेना, नक्की त्याचे काय बिनसले होते !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP