गोविंद केळकर - हा कुठून येतो वारा ? सारख...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हा कुठून येतो वारा ?
सारखा मला का छळतो ?
आगळा त्यातला गंध
मजपाशी केवळ उरतो
हा परिसर आहे नवखा
ही धूसर कातरवेळ
क्षितिज दूर आभासाचे
हा कुठवर चाले खेळ ?
अस्पष्ट जाणवे मात्र
गंधाशी माझे नाते
मी उभा स्तब्ध एकाकी
मग उगाच व्याकुळ होते
मी गर्द जांभळी छाया
भयभीत मनाच्या खंती
मी साद कुणाला घालू ?
अंधारुन आले भवती
अंधार जरा निवळाला
नीटशी दिसावी वाट
अल्वार पुन्हा बिलगावा
हरवलां गंध तो थेट !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP