जानकीवल्लभ शास्त्री - वाजवली मुरली कुणी ? जन्...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वाजवली मुरली कुणी ?
जन्मोजन्मीची ती परिचित
आली तान कुठुनी ?
वाजवली मुरली कोणी ?
पानोपानी कदंब फुलला
वार्यावरती झेले
यमुनेच्या डोळ्यांत तरळल्या
आशा लाटांमधुनी
वाजवली मुरली कोणी ?
अवघड वाटेवर जगण्याच्या
अडखळली पाउले
कोकिळकंठी सुस्वर जागे
निद्रित हृदयामधुनी
वाजवली मुरली कोणी ?
फिरफिरुनी वाटतो अचंबा...
नवल करी मन माझे
कठिण रागिणी कुणि गाइली
कोमल सुरांमधुनी
वाजवली मुरली कोणी ?
पुन्हा नभातुन प्रकटे मीरा
प्राशुनिया विषप्याला
कृष्णावरचा रुसवा निवळे
मोहक हास्यामधुनी
वाजवली मुरली कोणी ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP