अमृता भारती - ...तेव्हा कुणीच नसतं माझ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
...तेव्हा कुणीच नसतं
माझ्या आसपास
माझ्या सोबत
असतो केवळ तो
त्याच्या विचारांतून...
त्याच्या आठवणींतून...
आणि
त्याच्याविषयीच्या जाणिवांतून...
मी बाहेर जाते
निर्जन रानवाटेवर
उदयाला येत असलेल्या
चंद्राच्या दिशेनं निघते
किंवा
मी आतल्या भागात जाते
जिथं
खडकाशी लगटून
वाहत असते छोटीशी जलधार...
आठवण
किती एकटं,
किती एकांकी बनवून टाकते
मला
त्याच्यासोबत !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP