चंद्रशेखर सानेकर - मुळीच नाही माझ्याविषयी सं...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मुळीच नाही माझ्याविषयी संभ्रमात मी
जो काही आहे तो आहे जन्मजात मी
रिकामेच ते होते जेव्हा पकडले तुला
भरू कशाला गोळ्या नंतर पिस्तुलात मी !
देवच आला गप्पा मारत इथे घेउनी
नाहीतर जातोय कशाला देवळात मी !
एके दिवशी किरणे फुटली बोटांमधुनी
हात घातला होता कुठल्या विस्तवात मी ?
मासा बनलो मी दु:खाच्या सागरातला
अता काय बुडणार कुणाच्या सांत्वनात मी !
नव्या युगाचे अन्न खाउनी खुरटलो असा
जिवंत आहे केवळ माझ्या अवयवात मी !
कधीतरी होणारच माझा जंगली पशू
आज उपाशी फिरतो आहे माणसात मी
चिडतो होतो...तसाच गेलो आरशापुढे
नाहीतर देणार कुणाच्या मुस्कटात मी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP