सुखदेव ढाणके - कसा दयावंत झालासे निष्ठू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कसा दयावंत
झालासे निष्ठूर
लोटलासे पूर
अरिष्टांचा
ओल्या आसूडाने
झोडपले काठ
केले अंती घाट
उंबर्याचे
दडवली पोटी
आढ्यांची सावली
पाण्याची लावली
जीवा आग
काळजाच्या मेखी
घट्त बांधलेला
उखडून नेला
गावगाडा
वाहुटला दूर
काळीचा करंडा
पांढरीचा भुंडा
झाला घास
तुझ्या करणीची
करुणेला ठेच
कावळ्यांची चोच
धन्य केली
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP