प्रतिबिंब - आज गुलाबी पहाटे पहाटे पाह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आज गुलाबी पहाटे पहाटे
पाहिले मी फूला s s
हरऊनी गेलो मीच मजला
पाहता पाहता तूला ॥धृ॥
निळ्या आकाशी मेघ बहरले
बहर कळ्याना आला ।
पांघरघ्या शालीत साजने
उषःकाल जाहला ॥१॥
नक्षत्रांच्या रम्य फूलांचा
सुगंध मंद आला
रम्य पथावर बकूली फूलांचा
सडा आज शिंपला ॥२॥
अवचित आली कशी सांगना
तूडविण रंग फूलाना
दंव ओठावरी हळू बिलगले
भाव स्पर्श जाहला ॥३॥
मिठीत ये ग अशी साजने
कल्पतरू हासला
प्रतिबिंबाचे उषःकालात
सुर्योदय झाला.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP