रमानाथ अवस्थी ( १९२६-२००२ ) - ऐसे कधी नाही घडत, घडणारही...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ऐसे कधी नाही घडत, घडणारही नाही कधी
जळते धरा, बरसे न घन
भडके चिता, करपे न तन
दु:खाविना सगळेच क्षण
ऐसे कधी नाही घडत, घडणारही नाही कधी
दररोज निद्रा स्वप्नमय
संपू नये तारुण्य - वय
लाभो हवे ते नेहमी
राहू नये काही कमी
ऐसे कधी नाही घडत, घडणारही नाही कधी
सूर्य सकाळी ना उजळे
सांजेसही तो ना ढळे
लाट तटाशी ना उसळे
मृत्यूस स्वरचेतना मिळे
ऐसे कधी नाही घडत, घडणारही नाही कधी
दु:खाविना जीवन कटो
सौख्याससुद्धा मन विटो
पर्वत जणू विनाधूलिकण
प्रेमाविना राहील मन...
प्रेमाविना राहील मन...?
ऐसे कधी नाही घडत, घडणारही नाही कधी
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP