डॉ. धनराज खानोरकर - भिजे एकेक ढेकूळ, जीव फुटल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
भिजे एकेक ढेकूळ, जीव फुटला दाण्याला
असा निसर्गही साथ देई हिरव्या गाण्याला
मना लाख लाख डोळे, पाही सपान भाबडे
मातीच्या वा सुगंधाला घाली कस्तुरी साकडे !
भिजलेली चिंब धरा, ऊन्ह - साउलीचा फेर
शेत सांगते बापाले : ‘ मीच हक्काचे माहेर !
तुझ्या एकाच दाण्याची मोठी करीन मी रास
मोप देईल तुला ही तुझी माहेरची आस
वाया कधी जाऊ नये तुझा मातीतला घाम
तुझ्या काबाडकष्टाला मिळायला हवा दाम ’
***
शेत हीच माझी शाळा, तोच फळा अन् खडू
पीक मोतियाचे घेतो; पण डोळां येते रडू
आम्ही ‘ मास्तर मातीचे ’ अन् निधड्या छातीचे
कधी लागतील घरी दिवे प्रकाशवतीचे ?
मातीच्या या मास्तरांचे जेव्हां येतील दिवस
तेव्हा जगही म्हणेल : ‘ झाला भारतविकस ’ !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP