सौ. सुभद्रा नानासो गायकवाड. - जसा महापूर आला होता कृष्ण...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जसा महापूर आला होता कृष्णा कोयनेच्या पात्रात
तसा महापूर यावा ज्ञानगंगेला साहित्याच्या क्षेत्रात
मग वाहात वाहात जाऊनी मिळो कविताच्या दर्यात
माझी दरवळणारी शब्दफुले, सर्व शुभकार्यात
या ज्ञानगंगेत बुडून जावो, माझे तनरूपी घर
वाचण्यास धावूनि येतो, विचारवंत सानथोर
पण बुडणारच नाही कधी, माणे अक्षराचे छप्पर
बुडूनसुद्धा चमकणारी माझी, दिव्यज्ञान कौलार
शब्दसुमनांचा मी हा गुंफीला हार
ज्ञानगंगेचेच मी हे शिंपिले निर
अर्पण ज्ञानदेवा ज्ञानाचाच सदाबहार
काव्य कृष्णेला माझा आनंदाचा महापूर
सजिव सुवर्ण शब्दांची मी लाऊनि जोडी
काव्य रसात या माझ्या, अमृताचीच गोडी
विज्ञान युगात या करू सार्थक हो घडी
ज्ञानगंगेत माझी ही, तरंगते जुनी होडी
स्वार्थ अहंकाराचा मोडूनिया महाखांब
घेऊ ज्ञानगंगेचा भरूनिया शिरी कुंभ
प्रेम कस्तुरी नाभीमध्ये धावू नको लांब लांब
समतेच्या सागरात खरा मार्ग दिप स्तंभ
ज्ञान पाण्यात बुडावे सर्व भिजवावे तनमन
ज्ञानगंगेने घालावे शुद्ध विचाराचे स्नान
ज्ञानगंगेमध्ये आहे आदर्शाचे पुण्यदान
सुभद्रेच्या मनामध्ये ज्ञानगंगा धन्य धन्य
मग खळखळ वाहते निर्मळ कृष्णामाई
प्रेमळ नेत्री हसत पाहते कोयनाताई
हर्षुनी न्हाती मानव सर्व पशू पक्षी गाई
पाझरते लेखणित माझ्या ज्ञानगंगेचीच शाई
आनंदाचा महापूर यावा माझ्या नेत्रात
दुःखाचा महापूर नको महिलाच्या पात्रात
अरे मातेविन जन्म कसा तुझा कुळ गोत्रात
भारत मातेला अभिषेक करू सोनेरी छात्रात
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP