प्रा. सदाशिव भोसले - पश्चिमेच्या तुफान वार्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पश्चिमेच्या तुफान वार्यानं
गावाच्या वेशीतले डेरेदार लिंब
उन्मळून पडलेत
अन् जाताना घेऊन गेलेत
पारावरच्या गप्पांची मैफल
बेंदराची कर
पंचमीची गाणी
गणेशोत्सवाची मिरवणूक
नवरात्र - दसर्याला होणारी
गावकर्यांची लगबग
दिवाळीचा रंगीबेरंगी फराळ
उरसातल्या पिपाण्यांचा आवाज
हे सगळंच विरत चाललंय
त्या लिंबाची जागा घेतलीय
विदेशी झुडपांच्या टोकदार पानांनी
त्यांना कशी कळावी
पारावर झडणार्या शिळोप्याच्या
गप्पांची रंगत...?
आणि कसा कळावा
तिथला विसावा ?
व्हॉट्सऍपवरच्या ‘ स्मार्ट ’ गप्पांमध्ये
हे सगळंच हरवत चाललंय
त्या झुडपांना लाभलेत नवे संदर्भ
स्वार्थाचे, एकलकोंडेपणाचे...
आता गावपण उरलंय कुठं !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP