नरेंद्र शर्मा ( १९१३-१९८९ ) - काय तुला मी देऊ ? सांग प्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काय तुला मी देऊ ? सांग प्रियतमे, राणी तूच...
वेडे, या दुर्बल हातांनी
क्षण रोखून धरू शकशील कशी तू ?
केवळ क्षणभरास्तव होते हे
प्रणयामधले चंचल श्वास
किती भाबडी ! तुला वाटले...
हे आता जन्मभरीचे पाश !
मी वारा स्वच्छंद सदोदित
मला बद्ध करू शकशील कशी तू ?
वेलींना सोडुन जातातच ना
बागेतुन सगळे सुगंध...
सरोवरातुन हंसही उडती
लाटांचे तोडुनिया बंध
मग मीलनरात्रीचे रंग उभ्या
जन्मात भरू शकशील कशी तू ?
मी तर कायमचात फिरस्ता
मुक्काम असो हा काही क्षण
थांबवू नको तू मज रडुनी
मम अगतिक पार्यासम जीवन !
पुनवेनंतर अवसही येते...
अवस विस्मरू शकतील कशी तू ?
मज दिल्यास ज्या दुखमय भेटी
जन्मात तरी विसरेन कधी का ?
ते पहिले, अगदी पहिले चुंबन...
ही निरोपसमयीची अश्रुमालिका !
स्वप्न हवे अन् वास्तवताही ?
हे भान हरू शकशील कशी तू ?
काय तुला मी देऊ ? सांग प्रियतमे, राणी तूच...
तुज वास्तवतेचे भान हवे
की
पुन्हा पाहिजे स्वप्न नवे ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP