सतीश घुले - आता नकोत मला त्या आठवणी ज...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आता नकोत मला त्या आठवणी
जुन्या आणि नव्याही
कारण, चालताना त्यांच्या नादात
मी अडखळतोय
माझ्याच पावलांत...
आता नकोत मला कुठलीच गाणी
नवी आणि जुनीही
नकोत कुठलेच तराणे
कानांना ऐकवत नाही
आता प्रेमाचे कसलेच गार्हाणे
आता होऊ पाहतोय मी शांत
एखाद्या शमलेल्या वादळासारखा
निवांत होऊ पाहतोय
गर्द झाडीत, जिथे मला ऐकू येईल
केवळ माझ्याच हृदयाची धडधड
आणि पाखरांचा किलबिलाट !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP