सुप्रिया जाधव - दुरून सगळे कुठे कुणाला कळ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दुरून सगळे कुठे कुणाला कळते आहे ?
असून चंद्राजवळ चांदणी जळते आहे
झुलवत आहे अतप्तीच्या लटेवरती
स्वप्नामधली इच्छापूर्ती छलते आहे
प्रेम प्रेम जे म्हणतो, नक्की काय असावे ?
पुन्हा पुन्हा का पाउल तिकडे वळते आहे ?
सगळे त्याच्या डोळ्यांवरुनी समजत होते...
रात्र सख्याची बघून वैरी ढळते आहे
माध्यान्हीचे चटकेसुद्धा सुसह्य होते
कातरवेळी सगळे त्राणच गळते आहे
टंगळमंगळ पुरे जाहली आता मित्रा
धावत ये ना, मुहूर्तघटिका टळते आहे
पहिल्या अर्ध्या भागामध्ये संथ वाटले
दुसर्यामध्ये मात्र कथानक पळते आहे
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP