वैभव जोशी - मज आयुष्याचा माझ्या कळलेल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही
आभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होउनी भेटे
हा कोण म्हणावे माझा ? तिसकासा परिचय नाही
ही कमाल झाली आता माणुसधाणा होण्याची
माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही
विरहाची वर्षे सरली, ते मीलन दूर न आता
मृत्यूला खात्री अहे, मजलाही संशय नाही
एका जन्माच्या पाठी दुसर्या जन्माची धास्ती
असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP