सुनील खोडके - काळ... बदलत राहतो सतत आणि...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काळ...
बदलत राहतो सतत
आणि त्याच वदलत्या प्रवाहात
तुझ्या- माझ्यातला ‘उद्या’ ही बदलेल
दोघांच्याही वेगळ्या होतील वाटा
ती मात्र चालत राहीन त्याच वाटेवरुन
तुझ्या कधीही न विसरता येणार्या
अनेकानेक आठवणी
काळजाशी जपत...
तू अनुभवशील ‘उद्या’ नव्यानं
सारं काही नवं नवं
नवा श्वास, नवा प्रवास
नवं रान, नव्या वाटा
नवं सत्र, नवे मित्र
करतील तुझं स्वागत
थाटामाटात... नव्यानं !
मिळेल ते ते सारं काही
जे जे तुला हवं...
तुझ्याचसाठी उजळले जातील पुन्हा नव्यानं
ते विझलेले दिवे...
नवीन असेल घर-आंगण
नवनवी नातीगोती
पण विसरुन नकोस तू
कालच्या वाटेवरती माती...
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP