रत्नमाला शिंदे - एवढ्यासाठीच तर ऐटीत आहे म...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
एवढ्यासाठीच तर ऐटीत आहे मी
गैरसमजांच्या तुझ्या यादीते आहे मी
वाटते आयुष्य मागे चालले आहे
धावत्या कुठल्या अशा गाडीत आहे मी?
एवढे काही तुझ्या पासून तर शिकले
सांग आता, नेमकी कितवीत आहे मी?
जायचे कोठे मला माहीतही नाही
एवढे आहे खरे, घाईत आहे मी
फेकले होते कोठे तू मला तेव्हा?
आजही तुकडे जुने शोधीत आहे मी
पोचले आहे जिथे पोचायचे नव्हते
पण बरे झाले इथे गर्दीत आहे मी !
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP