प्रणाली पाटोळे - वाट तर कदाचित तू आजही बघत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वाट तर कदाचित तू आजही
बघत बसलेला असशील
पण माझ्याकडूनच चुकून
उशीर झालेला असेल...
माझ्या फुलणार्या स्वप्नांना
मीच छाटलेलं असेल
वेळ निघून गेल्यावर...
मग विषयही संपलेला असेल
उरलेला प्रत्येक धागा
माझ्याकडूनच तुटलेला असेल
चूक कुणाचीच नाही
माणसं ओळखताना
जरा माझाच घोळ झालेला असेल
चांदण्यांच्या स्वप्नाळू दुनियेतल्या
माणसांना कशावरून
मीच वेडी भुललेली नसेन ?
प्रश्नांच्या दुनियेत
उत्तरं शोधायला निघालेली
माझ्यासारखी मीच असेन !
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2017
TOP