सुनीति लिमये - जगण्याच्या आसक्तीतलं एखाद...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जगण्याच्या आसक्तीतलं एखादं फूल तरी फुलावं
कुठल्याही भीतीशिवाय
उमलून यावंमाझ्यातून आणि शांत हसत राहावं विश्वासानं
असं काहींसं...
दूरच्या कुठल्या तरी प्रवासाचे पडसाद ऐकू यावेत माझ्यातून
आणि दिवा व्हावा माझाच
असं काहींसं...
एकांतरेघेवरून चालताना दिशांनीच घ्यावेत हातात हात
फेर धरण्याऐवजी
असं काहींसं...
एकेक पायरी उतरत विहिरीचा तळ गाठावा आणि अलगद
सापडावा चंद्र
असं काहींसं...
मौनातून उतरावी भैरवीची संथ सुरावट आणि भारलं जावं आभाळ
असं काहींसं...
***
अधूनमधून घडत असतं...असं काहीसं
जगण्यातलं एक पान अचानक मोरपीस बनून जातं...
असं काहींसं...!
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP