भिमसेन देठे - अगं, आता कशाला या गोष्टी ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अगं,
आता कशाला या गोष्टी पुन:पुन्हा ?
साखर वाढलीय...
रक्तदाब वाढलाय...
किती जपणार आहेस माझ्या सत्तरीला ?
अगं,
मी तर तरणाबांद, पंचविशीतला तरुण !
केसांची झुलपं फ़िरवतोय पुन:पुन्हा...
ओठांवर रुजी घालतंय ते तेव्हाचंच गाणं
आजही...
भूतकाळातल्या कितीतरी आठवणी रुंजी
घालतायत मनात...
तेव्हा
सगळं काही असं
मागचंच आठवत आठवत
सध्याच्या जगण्यात आनंद मानायचा
आपण...!
चल,
जाऊ दे मला जरा बाहेर...
मोकळा वारा वाट बघतोय माझी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP