कु. बालीका बिटले - जिवनाच्या वाटेवर न्याय आम...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जिवनाच्या वाटेवर
न्याय आम्हाला मिळेना
हात शेतात राबती
खाया टुकडा मिळेना
मोठी यांच्या घरातला
केर आमचा संसार
आमच्या च पातळाला
नाय मिळत ठिगळ
रात दिवस राबतो
थेंब रगात आटतं
आमच्याच घामावर
मोठे खिसे भरतात
कित दिस सोसायच
किती खसता खायच्या
अशा नशिबाच्या गाथा
कुणा पुढ व गायच्या
रिन डोकीवर घिवून
आम्ही जन्माला आलो
तेच फेडता फेडता
आज आम्ही व चालातो
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP