संदीप वाकोडे - कशी सरता सरेना खुळी जगण्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कशी सरता सरेना
खुळी जगण्याची आस
विझू आल्या देहातही
आसक्तीचे दृढ पाश
चिंब चिंब भिजूनही
जीव कोरडाच सारा
वासनेच्या सागराला
नाही तृप्तीचा किनारा
असो भोवती कितीही
जिव्हाळ्याचा गोतावळा
ज्याच्या त्यालाच सोसाव्या
लागतात दुःख - कळा
ठावे जरी प्रत्येकाला
आहे एकदा सरणे
उरण्यासाठी तरीसुद्धा
चालू असते झुरणे !
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2017
TOP