गौरवकुमार आठवले - काळ हा नाही तुझ्यासाठी बर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काळ हा नाही तुझ्यासाठी बरा बाई
संस्कृतीला दे नव्याने हादरा बाई
तू जिजाऊ, तू रमाई, तूच सावित्री...
तू उदाच्या क्रांतिचा आहे झरा बाई
तू घडविले चेहरे अगणीत पुरुषांचे
अन् स्वतःचा तू हरवला चेहरा बाई
राहिली ना ही फुले साधीसुधी आता
ऐनवेळी घात करतो मोगरा बाई
एवढा टाकू नको विश्वास कोणावर
कोण आहे सभ्य - सज्जन सोयरा, बाई ?
तू नको अवघे हृदय देऊस कोणाला ?
एक राहू दे स्वतःचा कोपरा बाई
ही धरा, अंबब्र तुझे आहे...भरारी घे
सोड तू आभूषणांचा पिंजरा बाई
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP