कालिन्दी पराडकर, - घडयाळतून रोखून पाहतात अंध...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
घडयाळतून रोखून पाहतात
अंधाराचे डोळे
बाकी सारे भवताली
काळे काळे काळे ।
अंधार किती सराईत
अनाहूत येतो
सेकंदाच्या काटयामध्ये
काळीज अडकवून देतो
अंधार केवढा धीट
व्यापतो कानाकोपरा
माणूसच वाटतो त्याला
वेगळा आणि उपरा!
अंधाराची पावलं
पाचोळ्यावर वाजत नाहीत
पाय आहेत की नाहीत त्याला
मला काय माहीत!
अंधाराचे कान मात्र
फार फार तल्लख
प्रकाशाचे सारे कल्लोळ
क्षणार्धात् हल्लक !
अंधाराचं मन कधी
कळतच नाही
नीज आली नाही, तर
गातं कधी अंगाई !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP