मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
हा मेघ असा दाटुन येतो, बर...

प्रसाद कुलकर्णी - हा मेघ असा दाटुन येतो, बर...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


हा मेघ असा दाटुन येतो, बरसत नाही...
बहुधा त्याला कोसळायला फ़ुरसत नाही !

विसरायचे ठरवुनसुद्ध विसरत नाही

गतकाळाचे चित्र पुढे का सरकत नाही ?

कवी स्वत:ला सोलत असतो, भाजत असतो...
कविता केवळ शब्दांची ही कसरत नाही !

सहजपणाने झाले - गेले विसरायची...
कला मला ही तुझ्याप्रमाणे अवगत नाही

माझ्यासोबत सुखी असावे दु:खसुधा हे...
माझ्यावाचुन म्हणून त्याला करमत नाही

माझ्यापाशी अखेर माझे काही नाही...
मला तसेही व्यवहाराचे समजत नाही

प्रदर्शनाची नकोच घाई वेडाबाई...
अपुले नाते म्हणजे काही रुखवत नाही !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP