इंदिरा दास - नतमस्तक तुझ्या चरणी प्रभू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
नतमस्तक तुझ्या चरणी प्रभू मी सदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा ॥
भिजेल कारे काळी माती
होतील कारे तडे हद्दपार
उगवतील कारे टपोरे मोती
बनेल कारे शिवार हिरवे गार
नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा ॥१॥
देशील कारे आनंद आमुच्याही वाटी
भरशील कारे पैशानी झोळी मोठी
नको तो अवकाळी पाऊस
नको तो गारपिटाचा मारा
नको कर्जबाजार अन् फ़ाशीचा फ़ंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा ॥२॥
पेरीन मी बियाणे पांघरून काळी माती
वाढतील रोपे शेतामंदी करतील दाटी वाटी
करीन मी मशागत अन् कापणी मळनी
भरीन माझे घरकुल धानियांच्या कण्यग्यांनी
नको करू देवा चुराडा सपनाचा अन् नशिबाचा सौदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा ॥३॥
देवाने दिलं रे परी दैवाने नेलं
सौदा कराया मंदीमधी आला हा दलाल
झाला दलाल शिरीमंत, मी मात्र कंगाल
फ़ेडू कसे कर्ज आता, झालो मी हवालदिल
देवा नको हा नशिबाचा सौदा अन् दलालीचा धंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा ॥४॥
Last Updated : November 11, 2016
TOP