विश्वनाथप्रसाद तिवारी - काहीच नव्हतं बाहेर सगळं ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
काहीच नव्हतं बाहेर
सगळं ब्रह्मांड
सामावून गेलं होतं देहात
काहीच नव्हतं आत
सगळी चेतना
झेपावली होती अंतरिक्षात
मग
आपल्या अमर प्रेमाचा
तो कोणता क्षण होता
जो आपल्याला
अनुभवता आला नाही ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP