भाऊ शिगवण - पाऊसदादा, पाऊसदादा सांग न...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पाऊसदादा, पाऊसदादा
सांग ना माझ्या आईला
येत तुझी सर पहिली
भिजू दे ना मला...
भिजलो मी तर आई
म्हणे...पडेन मी आजारी
होतं का रे असं कधी !
सांग ना रे तू तरी...
पावसात भिजण्याची
गंअम्त असे न्यारी
मग तूच सांग...कसं
कुणी पडेल रे आजारी...
पावसात पाण्यामध्ये
सोडीन मी होड्या
मनसोक्त भिजेन अन्
मारीन मी उड्या...
सांग ना रे आईला
समजावून तू जरा
देईन तुला एक पैसा
अगदी खरा खरा...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP