सत्यपाल आनंद - मी काल रात्री आकाश कोसळत...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी काल रात्री
आकाश कोसळत असताना पाहिलं
आणि मला वाटलं की
आता होणार कदाचित
धरती आणि आकाश यांचं मीलन !
रात्र उलटली
क्षितिजावर तांबडं फुतलं...
तेव्हा अवतरू लागलेल्या सूर्याला
थांबवत आणि त्याचा हात हातात घेत
मी त्याला म्हणालो :
‘ बंधो, थांब...
तू दोन पावलंही पुढं टाकलीस तर
कदाचित आकाश कोसळेल ! ’
सूर्यानं माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहिलं
आणि आपला मोहरा
समोरच्या दिशेला वळवत
तो मला हळू आवाजात
सावकाश म्हणाला :
‘ आकाश रोजच रात्री
कोसळत असतं...
पण दोघांचं मीलन
कधीच होत नाही ! ’
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP