सुजित कदम - मेंदूतल्या घरटयात जनमलेली...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मेंदूतल्या घरटयात जनमलेली
शब्दांची पिलं
मला जराही स्वस्थ बसू देत नाहीत
सुरु असतो त्यांचा चिवचिवाट सतत
कागदावर उतरण्याची त्यांची धडपड
मला सहन करावी लागते
जोपर्यंत घरटं सोडून शब्द न् शब्द
पानावर मुक्त विहार करत नाहीत तोपर्यंत
आणि
तेच शब्द
कागदावर मोकळा श्वास घेत असतानाच
पुन्हा एखादा नवा शब्दपक्षी
माझ्या मेंदूतल्या घरटयात
आपल्या पिलांना सोडून्द उडून जातो
माझी
अस्वस्थता
चलबिचल
हुरहूर
अशीच कायम टिकवून ठेवण्यासाठी...
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP