वि. म. बोते - ही पत्नी, माता, भगिनी अशी...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ही पत्नी, माता, भगिनी अशी अनेक नाती जगते
नात्यांच्ता फ़ुलण्यासाठी ही जन्मोजन्मी खपते
सगळ्यांचे दुखणे खुपणे सगळ्यांचे औषधपाणी
हे जिवापाड करताना स्वत:ला विसरत असते
जीवनात वादळवारे सार्यांना टक्कर देते
घर आवरता आवरता हे घरही सावरते
ही अजब प्रेरणा स्त्रोत, उन्मेष शालिनी झोत
हे जगण्याच्या जिद्दीने हरेक लढाई लढते
ही सहनशीलता, ऋजुताही करूणा माया ममता
ही चंदनखोड हमेशा घर हिच्यामुळे दरवळते
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP