प्रा. डॉ. वर्षा गंगणे - चुलीवरती फ़ुटक्या केला ने...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
चुलीवरती फ़ुटक्या
केला नेटका संसार
ठिगळांनी सावरला
डोईवरचा पदर
चूल पेटताना उठे
उभा धुराचा डोंगर
पेटुनिया उठताना
रात्रंदिसाचा जागर
उभ्या हयातीत केली
पोटासाठी तगमग
निखार्यातून पेटत्या
चेतवलं सारं जग
चुलीतल्या जाळासंगं
राख झाली स्वप्नं सारी
धग सोसता सोसता
करपली गं भाकरी
राब राब राबताना
झाले लोखंडाचे हात
चूल लिपता लिपता
गेली अचघी हयात
लिपलेल्या चुलिइसवे
मन करी हितगूज
‘ राखशील का गं सखे
माझ्या संसाराची बूज ?’
पोटातल्या आगेसवे
लागे वणवा डोळ्यांत
अगणित सवालांचं
चाले तांडव मनात
आज पेटली तशीच
उद्या पेटेल का चूल ?
निजताना मनामध्ये
नित्य एकच सवाल !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP