सुनील तांबे - व्हीटी, फ़ाउंटन, युनिव्हर्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
व्हीटी, फ़ाउंटन, युनिव्हर्सिटी वा मंत्रालय या नरिमन
पॉइंटच्या
एखाद्या इमारतीत असताना जाणवत नाही
अर्ध्या किलोमीतरवर आहे समुद्र
मुंबईत दिसतोच तो
पण नसतो आपल्या जवळ
आपल्याला दिसतात फ़ेसाळलेल्या लाटा
किनार्यावर थडकणार्या
समुद्र असतो रोमॅंटिक
ब्रीच कॅंडीच्या दगडाआड
प्रेयसीसोबत गुजगोष्टी करणारा
दूर कुठंतरी सूर्याला पोटात घेणारा
कोळ्यांना म्हणजे तांडेलाला विचारा
तो सांगेल त्याचा समुद्र
तिथं किनारा असतो क्षितिजावर
आणि पाण्यामध्ये नसतात कोणत्याही खाणाखुणा
जीपीएक सिस्टिम नसताना केवळ आकाशात बघून
पाण्यावर चालायचं असतं माशांच्या शोधात
तांडेल फ़ोकस्ड् असतो समुद्रावर
त्याला दिसतात त्याच्या लाटांमधले सूक्ष्म बदल
तापमानातले, वार्यातले, भरती - ओहोटीचे
त्यावरून तो ताडतो समुद्राच्या पोटात असणारे
माशांचे थवे
बांगडे, सुरमई, पापलेट आणि काय काय...
तो सांगेल तिथं जाळं टाकल्यावर
मिळते चांदीची मासोळी
एकदा उतरा त्या खुल्या समुद्रात
लाईफ़ बोट किंवा अन्य कोणत्याही
आधाराशिवाय
मग समजतं भरती आणि ओहोटी काय असते ते
ओहोटी खेचत असते आत आत
घसा कोरडा पडतो तिच्याशी झगडताना
हात - पाय थकून जातात
समुद्राच्या पाण्यातला देह
घामानं जलसमाधी घेणार आपण
याची खात्री होते आपली
तरीही आपण तरंगत राहतो
चमत्कार वाटावा अशा सहजतेनं
भरती फ़ेकून देते देहाला
किनार्य़ावर
तिचे मनोमन आभार मानत
लडखडत, रांगत आप्ण कसेबसे पोचतो
वाळूच्या किनार्यावर
नशीबवान असतो आपण
जेली फ़िशच्या वा पतंगाच्या दंशापासून
वा शार्कच्या जबड्यातून सुटलेले
भर उन्हात आपण गाढ झोपी जातो
तापलेल्या वाळूवर
स्वप्नामध्ये दिसतो
निळा, हिरवा, जांभळा समुद्र
आणि फ़ेसाललेल्या लाटा
अंगोपांगात मुरलेला असतो खार्या पाण्याचा गंध
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP