ज्ञानेश्वर बाविस्कर - कविता करायची होती एकदा मन...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कविता करायची होती एकदा
मनातला अर्थप्रवा
येईच ना कागदावर.
कितीतरी युक्त्या केल्या...
मिटले डोळे,
डोकं शांत ठेवलं,
एकांतही गाठला,
खेळत बसलो शब्दांशी
कितीतरी वेळ,
मनाचीच झाली कुचंबना...
पेनाने मग बेभान होऊन
रेघा ओढत बसलो,
तिरकस, गोल, रूंद
विविधाकाराच्या अन्
सहज जमल्या तशा
काही काढल्या आकृत्याही...
भानावर आलो तेव्हा
याच आकृत्या
वाचता येऊ लागल्या
अर्थांसकट
कवितांसारख्या...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP