ॐकार जोशी - मुद्दा विश्वासाचा झाला म्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मुद्दा विश्वासाचा झाला
म्हणून मतभेदाचा झाला
निमित्त झाले स्वप्नांचे मग
सराव अंधाराचा झाला
मना! तुझा एकेक कोपरा
ज्याचा झाला; त्याचा झाला
तुला फायदा झाला नाही
(मला फायदा याचा झाला)
संधी प्रत्येकाला आली
वांधा एकेकाचा झाला
कधीच नव्हता झाला पूर्वी
इतका त्रास कुणाचा झाला?
आता विसरू झाले-गेले
हा भाग विनोदाचा झाला
सोड्वून पहू या आपण
गुंता कशाकशाचा झाला
जो तो समदुःखी भेटावा?
(दुःखाचाही साचा झाला)
चित्ताचा पारा उडल्यावर
मेंदू काचा काचा झाला
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP