सुबोध पारगवकर - खूप वेळ मी एकटक पाहत होत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
खूप वेळ
मी एकटक पाहत होतो
एक फाटका माणूस
भिंतीच्या दगडाशी
तावातावनं बोलत होता...
मी ते ‘ संभाषण ’
कान देऊन ऐकत राहिलो
मला प्रश्न पडला,
त्याचं त्या दगडाशी
काही नातं असेल का ?
मी त्या माणसाचाच
विचार करत राहिलो
त्याचं ते संभाषण
ते हातवारे सुरूच होते...
त्या दगडातून
काही प्रतिशब्द येत होते का ?
कदाचित येतही असावेत !
आणि ते फक्त तोच ऐकू शकत असावा...
माझ्याकडं पाहत आणि हसत
तो पुन्हा
त्याच्या त्या ‘ शून्य संभाषणा’त मग्न झाला
आणि इकडं
त्याच्याविषयीच्या विचारांनी
माझ्या मनाचा होत गेला दगड...
शून्यवत् !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP