रघुवीर सहाय - प्रिय प्रेक्षकहो, ही जी ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
प्रिय प्रेक्षकहो,
ही जी स्त्री तुम्ही पाहत आहात ना,
ती माझी सहचारिणी आहे...माझी स्त्री !
हिचं माझ्यावर प्रेम आहे
पण हाही माझ्या लेखी एक विरोधाभासच म्हणायचा !
कारण, हिचं माझ्यावर प्रेम असणं
ही गोष्ट मलाही तितकीच प्रिय आहे - असावी
असं तिला जे वाटतंय
तेवढं काही माझं तिच्यावर प्रेम नाहीय...
ही सुंदर आहे...पण मनोहारिणी नाही
ही मधुर - गोड आहे...पण नखरेल - लाघवी नाही
ही उत्साही आहे...पण चपल नाही
ही बुद्धिमान आहे...पण चंचल नाही
पाहा, ही माझी सहचारिणी आहे...माझी स्त्री !
आणि हिच्यासमवेत माझं
आजवरचं कितीतरी आयुष्य सरलंय
आणि हिच्यामुळंच
मी आत्तापर्यंत सखी होतो...
खरं सांगायचं तर, खूप खूप सुखी होतो, असंही नाही !
पण दुःखी - व्यथित राजाला आढळलं
की मी सुखी आहे
तेव्हा त्यानं मनोमन ठरवलं की
मी ज्या कारणामुळं सुखी आहे
ते कारणच अस्तित्वात राहू नये
म्हणजे मग मीसुद्धा सुखी राहणार नाही...
त्याचा आदेश आहे की
मी हिची हत्या करून
हिला नष्ट करून टाकावं
ही निरपराध आहे...अनभिज्ञसुद्धा
आता आपलं आयुष्य
यापुढं काही जास्त उरलेलं नाही
याची तिला जाणीवही नाही
पाहा...
किती उत्साहानं
ती माझ्या दिशेनं येत आहे...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP