नंदकिशोर नवल - ज्योतिर्मय होऊ लागली आहेत...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ज्योतिर्मय होऊ लागली आहेत
माझ्या प्राणाची शिखरं
माझ्या मनाच्या राईत
वाहू लागलंय चंदनगंधित वारं
बरसत आहे चांदण्याचं अमृत
माझ्या अंतर्मनाच्या सुपीक भूमीवर
फुटू लागली आहे पालवी
माझ्या हृदयाच्या डहाळीला
रूप पालटू लागलं आहे
माझ्या जाणिवांचं क्षितिजही
एका अलौकिक जगतातून
उतरू लागली आहेत अद्भुत किरणं
माझ्या मनोविश्वात
आतलं कवच भेदून
तू उदयमान
होत आहेस काय
प्रेमा ?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP