अविनाश भिडे - पानगळीतल्या पिंपळपानाला न...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पानगळीतल्या पिंपळपानाला नसतं माहीत
पाण्यात बुडणार्या मुंगीला
वाचवणार आहोत आपण....
सुकलेल्या काटकीला कुठं असतं माहीत
एका घरट्याला आधार देऊन
कुण्या पाखराचं जीवन
फुलवणार आहोत आपण....
पुजेतल्या निर्माल्याला नसतं माहीत
खत होऊन पुन्हा बीजाला
पुनरूज्जीवन देणार आहोत आपण....
नदीला नाही कळत
सागरात विलीन होण्यापूर्वी
अनेकांना जीवन देणार आहोत आपण....
म्हणूनच, म्हणूनच....
विलय होण्यापूर्वीच
विलीन होऊ नये....आपणही!
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP