मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
प्रेमाचे प्रतीक आकाश - धर...

खलील मोमीन - प्रेमाचे प्रतीक आकाश - धर...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


प्रेमाचे प्रतीक आकाश - धरती
सर्जन उत्कर्ष प्रेमाची प्रचीती

शब्दात, स्वरात प्रेमाचा निनाद
नभाचा धरेशी क्षितिजसंवाद

काळास प्रेमाचे लाभले चरण
प्रेमच काळाच्या गतीचे कारण !

अनाम ओढीने वाहतो प्रवाह
प्रेमाचा असह्य झाल्याने विरह

अवघ्या सृष्टीत प्रेमाचा जागर
चुंबितो काठास भेदून सागर

रानात - वनात प्रेमाला उधाण
प्रेमाने गोंजारी तृणास किरण

फुलांना प्रेमळ दवाचे दागिने
पाहून वार्‍याला स्फुरती कवने !

प्रेमळ मनाची प्रेमळ संपत्ती
प्रेमात सुसह्य प्रत्येक आपत्ती

प्रेमास प्रेमाने हृदयी धरता
शब्दांना सर्वस्व अर्पिते कविता

आयुष्य प्रेमाचे अदृश्य इंधन
अर्पावे प्रेमास करून वंदन !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP