वृंदा भांबुरे - ऊन्ह ढळे, नभ वितळे सावल्य...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ऊन्ह ढळे, नभ वितळे
सावल्यांत सांजरंग
झरतो का ओठांवर
आर्त आर्त हा अभंग ?
ऋतु हिरवा सरताना
देहफ़ूल विरताना
सांद्र निळ्या क्षितिजावर
जांभुळसा एक रंग
स्वार्थाची उंच गढी
पापाचे खण उघडी
मोहाने भरकटला
वार्याचा उनाड संग
कातरसे पहाड गूड
घरट्याला पंखओढ
पुळणीवर मिटणारे
अंधुकसे जलतरंग
पाझरु दे अमृतघन
रंध्रातुन या श्रावण
तन - मनास वेढू दे
श्यामसावळाच रंग
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP