प्रज्ञा घोडके - गजबज नसलेलं एक गाव आपल्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
गजबज नसलेलं एक गाव
आपल्या नादात असलेलं
सण - वार जपणारं
बारा बुलते असणारं
घर कधी गावात, कधी बाहेर
हळूहळू सरकलेलं...
राब राब राबून, कष्ट करून
आई - बाबांचं तन - मन दमलेलं
त्यांचं पोर मात्र बोट सोडून
इकडं तिकडं रमलेलं
कधी आज इकडं, कधी उद्या तिकडं
पण...रोजच्या आशेवर जगणारं
तिथं कितीतरी घडलेलं, घडणारं
म्हणूनच माझं म्हणावंसं वाटणारं...गाव
हे गाव आताशा कितीतरी दूर दूर वाटतं
पण तसं तर फक्त म्हणण्यापुरतंच दूर दूर...
पण मनाच्या कितीतरी जवळ...
एक गाव...माझं गाव !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP