ज्ञानेश्वर बाविस्कर - वाहनांच्या झुंडीत अडकून ह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वाहनांच्या झुंडीत अडकून
होत राहतो श्वासांचा
नुसता कोंडमारा
कर्कश भोंगे, किंकाळ्या, गोंगाट
निमुटपणे सहन करावं लागतं सगळं
प्राबब्ध समजून !
कधी होईल सुटका
या कचाट्यातून एकदाची
म्हणून मोजावी लागते
वाहतूकभर टिकटिक....
तुलही येतो का उबग
बसल्या बसल्या
देवळात घंटानाद होतो तेव्हा ?
माणसांच्या निरनिराळ्या नवसांचा
किंवा मग नावडीच्या नैवेद्याचा
कधी वाटतो का तिटकारा ?
रीघ टाळून वाटतं का
करावंसं पलायन ?
की तूही मोजतोस
गाभार्यातळ टिकटिक
निवांत ?
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2017
TOP