विजय माळी - घामास भाव माझ्या कवडीदरात...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
घामास भाव माझ्या कवडीदरात आहे
सडतो असाच कांदा माझ्या मळ्यात आहे
कांद्यास भाव नाही, कापूसही उठेना...
मेल्यास भाव येतो... ‘ तो ’ बुचकळ्यात आहे !
शेतात काय माझ्या शेळी चरून गेली ?
बापास जाण होती, ज्वारी खळ्यात आहे !
ओलीच लाकडे ही माझ्या चुलीत होती...
ओल्यासवे जळे मी...जगणे धुरात आहे !
लागे जिवास चिंता अन् रोगही पिकला...
तारावयास पाणी कुठल्या तळ्यात आहे ?
ढग कोरडाच होता एकेक, आसवांचा...
ही कोरडी सुगी मग माझ्या घरात आहे !
केली कधीच नाही पूर्ती वचन दिल्याची
आश्वासनेच देणे पण धोरणात आहे !
N/A
References : N/A
Last Updated : April 24, 2017
TOP